Skip to content
स्तोत्रसंहिता ८३:१३-१८

अंतिम ध्येय: देवाचे सार्वभौमत्व प्रकट होणे

स्तोत्रसंहिता ८३:१३-१८
१३
हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत, वार्‍याने उडणार्‍या भुशागत त्यांना करा.
१४
अग्नी वनाला भस्म करतो, ज्वाला डोंगराला आग लावते,
१५
आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग करा, व आपल्या तुफानाने त्यांना घाबरवून सोडा.
१६
हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा, जेणेकरून त्यांनी तुमच्या नावाचा शोध करावा.
१७
ते कायमचे फजीत होवोत आणि गोंधळून जावोत; त्यांचा लज्जास्पद नाश होऊ द्या.
१८
त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options