Skip to content
स्तोत्रसंहिता ७८:१०-१४

स्तोत्रसंहिता ७८:१०-१४

१०
त्यांनी परमेश्वराचा करार पाळला नाही, आणि त्यांच्या नियमशास्त्राप्रमाणे जगण्यास नकार दिला.
११
त्यांनी केलेली महत्कार्य, त्यांनी दाखविलेले अद्भुत चमत्कार ते विसरले.
१२
त्यांनी आपल्या पूर्वजांसमोर इजिप्तमधील सोअनाच्या मैदानावर अद्भुत कृत्ये केली.
१३
परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्यातून त्यांना पार नेले; त्यांच्या दोन्ही बाजूंना पाणी भिंतीसारखे उभे राहिले.
१४
दिवसा ते त्यांना मेघाच्या साहाय्याने आणि रात्री अग्निस्तंभाच्या प्रकाशाच्या साहाय्याने वाट दाखवित नेत असत.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.