Skip to content
स्तोत्रसंहिता ७:६-१०

स्तोत्रसंहिता ७:६-१०

हे याहवेह, आपल्या रागाने उठा; माझ्या शत्रूंच्या क्रोधाविरुद्ध उभे राहा; जागे व्हा आणि न्याय्य निर्णय द्या.
उच्चस्थानी सिंहासनावर आरूढ असता, सर्व राष्ट्रांनी तुमच्याभोवती एकत्र जमावे.
याहवेहच, सर्व मानवजातीचा न्याय करोत. माझ्या प्रामाणिकपणानुसार तुम्ही माझे समर्थन करा. हे सर्वोच्च परमेश्वरा! माझ्या धार्मिकतेनुसार माझा न्याय करा.
दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा नीतिमानाला स्थिर करा— तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात.
१०
सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options