Skip to content
स्तोत्रसंहिता ७:१-५

स्तोत्रसंहिता ७:१-५

बिन्यामीनी कूशच्या बोलण्यावरून याहवेहस गायलेले दावीदाचे शिग्गायोन. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो; जे माझ्या पाठीस लागले आहेत, त्या सर्वांपासून माझे रक्षण करा आणि मला सोडवा.
नाहीतर, सिंहाप्रमाणे ते मला फाडून टाकतील; मला सोडविण्यास कोणीही नाही म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील.
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल, माझे हात सदोष असतील,
जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल, माझ्या शत्रूला विनाकारण लुबाडले असेल—
तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत; माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो. सेला
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options