मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ६८:२८-३१

सामर्थ्यासाठी व राष्ट्रांच्या अधीनतेसाठी प्रार्थना

स्तोत्रसंहिता ६८:२८-३१
२८
हे परमेश्वरा, तुमचे बळ एकवटून; तुम्ही आमच्यासाठी पूर्वी केले, तसे तुमचे सामर्थ्य प्रगट करा.
२९
पृथ्वीवरील राजे यरुशलेमातील तुमच्या मंदिराच्या गौरवामुळे तुम्हाला भेटी घेऊन येत आहेत.
३०
हे परमेश्वरा, लव्हाळ्यात राहणार्‍या वनपशूंना, बैलांचा कळप आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वासरांना धमकावा; खंडणीची तीव्र इच्छा बाळगणार्‍यांना पायाखाली तुडवा, आणि युद्धात आनंद मानणार्‍या राष्ट्रांची दाणादाण करा.
३१
इजिप्त देशातून राजदूत येतील; कूश परमेश्वरापुढे नम्र होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options