Skip to content
स्तोत्रसंहिता ५९:१-५

स्तोत्रसंहिता ५९:१-५

संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीदाला ठार करण्याच्या उद्देशाने शौलाने त्याचा घरावर पाळत ठेवण्यासाठी सैनिक पाठवले तेव्हा ही घटना घडली. हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा; जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यापासून रक्षण करण्यास माझे दुर्ग व्हा.
दुष्कर्म करणार्‍यांपासून आणि या रक्तपिपासू लोकांपासून माझा बचाव करा.
पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत! याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.
मी काही चुकीचे केले नसले तरी ते माझ्यावर आक्रमण करण्याची तयारी करीत आहेत. हे परमेश्वरा, उठा, माझ्या कष्टांकडे पाहा आणि मला साहाय्य करा.
याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या परमेश्वरा, जागृत होऊन सर्व राष्ट्रांना दंड करा. या दुष्ट, विश्वासघातकी लोकांना दयामाया दाखवू नका. सेला
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options