स्तोत्रसंहिता ५५:१६-१८
१६
मी तर परमेश्वराचा धावा करेन आणि याहवेह माझे तारण करतील.
१७
संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी मी वेदनांनी आरोळी देईन आणि ते माझी वाणी ऐकतील.
१८
जरी माझे बरेच विरोधक तिथे होते, जे युद्ध माझ्याविरुद्ध सुरू होते, तरी ते मला कोणतीही इजा होऊ न देता सोडवितात.