Skip to content
स्तोत्रसंहिता ५:८-१२

स्तोत्रसंहिता ५:८-१२

याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा, माझ्या शत्रूंमुळे— माझ्यासमोर तुमचा सरळ मार्ग मला दाखवा.
त्यांच्या मुखातून निघालेल्या एकाही शब्दावर विश्वास ठेऊ शकत नाही; त्यांचे हृदय द्वेषाने भरलेले आहे. त्यांचे कंठ उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात.
१०
परमेश्वर, त्यांना दोषी घोषित करा! त्यांच्या कारस्थानामुळेच त्यांचे पतन होवो. त्यांच्या अनेक अपराधांमुळे त्यांना तुमच्यापासून दूर घालवून द्या, कारण त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले आहे.
११
परंतु जे सर्व तुमच्याठायी आश्रय घेतात ते आनंदित होवोत; त्यांना सदैव हर्षगीते गाऊ द्या. तुम्ही त्यांचे रक्षण करता, ज्यांना तुमचे नाव प्रिय आहे, त्यांनी तुमच्यामध्ये आनंद करावा.
१२
याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता; तुमची कृपा एखाद्या ढालीप्रमाणे त्यांना वेढलेली असते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options