स्तोत्रसंहिता ४९:१२-१४
१२
परंतु लोकांची संपत्ती कितीही असली, तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत.
१३
ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे, व जे त्यांच्याशी सहमत आहेत, त्यांचेही असेच होणार. सेला
१४
ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.
Settings