Skip to content
स्तोत्रसंहिता ४१:४-९

स्तोत्रसंहिता ४१:४-९

मी म्हणालो, “याहवेह, माझ्यावर दया करा; मला रोगमुक्त करा, कारण मी तुमच्याविरुद्ध पातके केली आहेत.”
माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात, “तो केव्हा मरणार आणि त्याचे नाव विसरले जाणार?”
जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो, तेव्हा तो पोकळपणा दर्शवितो, तो अंतःकरणात वाईटाचा संग्रह करतो; तो बाहेर जाऊन या गोष्टीचा प्रचार करतो.
माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात; माझ्याबाबतीत वाईट बेत आखतात.
“त्याला असाध्य रोग झालेला आहे; तो आता या रोगशय्येवरून पुन्हा उठणार नाही,” असे ते म्हणतात.
प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options