स्तोत्रसंहिता ३९:९-१२
९
मी शांत राहिलो; मी माझे तोंड उघडले नाही, कारण तुम्हीच हे केले आहे.
१०
तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा; तुमच्या हाताच्या प्रहाराने मी म्लान झालो आहे.
११
तुम्ही मनुष्याला त्याच्या पापाबद्दल फटके मारून शिस्त लावता, त्याचे ऐश्वर्य कसर लागलेल्या वस्त्रांप्रमाणे निकृष्ट करता; निश्चितच मनुष्य खरोखर केवळ श्वासमात्र आहे. सेला
१२
“याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची आरोळी ऐका; माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करू नका. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे या पृथ्वीवर प्रवास करणारा मी एक परदेशीय आणि वाटसरू आहे.
Settings