मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ३६:५-९

देवाच्या गुणांचे अमर्याद वैभव

स्तोत्रसंहिता ३६:५-९
याहवेह तुमची प्रीती स्वर्गापर्यंत, व तुमची सत्यता आकाशापर्यंत पोहोचली आहे.
तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे, तुमचे न्याय अथांग खोलीसारखे आहेत. याहवेह, तुम्ही मनुष्य आणि प्राण्यांची जोपासना करता.
हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे! सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते.
तुमच्या भवनातील विपुलतेतून तुम्ही त्यांना तृप्त करता; आपल्या आनंदाच्या नद्यांचे पाणी तुम्ही त्यांना पाजता.
कारण जीवनाचा झरा तुमच्याजवळ आहे; तुमच्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश मिळतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options