स्तोत्रसंहिता २७:२-५
२
जेव्हा वाईट लोक मला गिळण्यास माझ्यावर हल्ला करतील, तेव्हा माझे शत्रू व माझे विरोधकच अडखळतील आणि पडतील.
३
जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला, तरी माझे अंतःकरण भयभीत होणार नाही; माझ्याविरुद्ध युद्ध जरी पेटले, तरी मी निश्चिंत राहीन.
४
मी याहवेहला एक याचना केली, हीच माझी आकांक्षा आहे: मी आयुष्यभर याहवेहच्या भवनात वस्ती करावी जेणेकरून मी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्या मंदिरात ध्यान करावे.
५
कारण संकटाच्या दिवसात ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील; तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील; उंच खडकावर मला सुरक्षा देतील.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings