Skip to content
स्तोत्रसंहिता २२:१०-२२

स्तोत्रसंहिता २२:१०-२२

१०
मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे. मी आईच्या उदरात असल्यापासून तुम्ही माझे परमेश्वर आहात.
११
माझ्यापासून दूर राहू नका, कारण संकट जवळ आहे आणि मला साहाय्य करणारा कोणी नाही.
१२
अनेक बैलांनी मला घेरले; बाशानातील दांडग्या बैलांनी मला घेरलेले आहे.
१३
गर्जना करीत आपल्या भक्ष्यांवर तुटून पडणार्‍या सिंहाप्रमाणे उघड्या जबड्यांनी ते माझ्यावर चालून येत आहेत.
१४
माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे, माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्याआत वितळून गेले आहे.
१५
माझे मुख खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे.
१६
मला कुत्र्यांनी वेढले आहे, दुष्कर्म्यांची टोळी मला घेरून आहे; त्यांनी माझ्या हातापायाला विंधले आहे.
१७
माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो, हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत.
१८
ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात.
१९
परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरेने या.
२०
तलवारीपासून मला सोडवा, कुत्र्यांच्या आक्रमणापासून माझे मोलवान प्राण वाचवा.
२१
सिंहाच्या जबड्यातून; रानटी बैलांच्या शिंगापासून माझे रक्षण करा.
२२
मी तुमचे नाव माझ्या लोकांसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन करेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options