Skip to content
स्तोत्रसंहिता १४५:८-१३

परमेश्वराचा कृपाळू स्वभाव व राज्य

स्तोत्रसंहिता १४५:८-१३
याहवेह करुणामय व कृपावान आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने ओतप्रोत भरलेले आहेत.
याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात; त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते.
१०
याहवेह तुमची निर्मिती तुमची उपकारस्तुती करेल, आणि तुमचे संतजन तुम्हाला धन्य म्हणतील.
११
ते तुमच्या साम्राज्याच्या भव्यतेचे वर्णन आणि तुमच्या सामर्थ्याची उद्घोषणा करतील.
१२
जेणेकरून तुम्ही केलेली अद्भुत कृत्ये आणि तुमच्या अप्रतिम राजवैभवाबद्दल सर्व मानवजातीस ज्ञान होईल.
१३
कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे, तुमची सत्ता पिढ्यान् पिढ्या चालते. याहवेह आपल्या सर्व प्रतिज्ञांशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या सर्व कार्यात ते विश्वासू असतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options