Skip to content
स्तोत्रसंहिता १४४:७-१५

स्तोत्रसंहिता १४४:७-१५

स्वर्गातून आपला हात लांब करून मला मुक्त करा; जलप्रवाहाच्या तडाख्यापासून मला सोडवा, आणि परक्यांच्या सामर्थ्यापासून मला मुक्त करा.
त्यांचे मुख असत्य वचनांनी भरलेले असते; त्यांचे उजवे हात कुकर्म करणारे आहेत.
हे परमेश्वरा, मी तुमच्यासाठी एक नवे गीत गाईन; दशतंत्री वीणेवर मी तुमच्या स्तवनाचे संगीत बनवेन.
१०
राजांना विजय तुमच्यामुळेच प्राप्त होतो, आणि तुमचा सेवक दावीदाला सुरक्षा प्रदान करणारे तुम्हीच आहात. घातकी तलवारीपासून
११
मला सोडवा; ज्यांची मुखे लबाड्यांनी भरलेली आहेत, ज्यांचे उजवे हात फसविणारे आहेत. त्या परक्यांच्या हातून मला सोडवा.
१२
मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या परिपक्व रोपांसारखे होतील; आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या कोरीव स्तंभासारख्या होतील.
१३
आमची अन्नभांडारे सर्वप्रकारच्या वस्तूंनी भरलेली असतील, आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट, दशसहस्त्रपट वाढतील.
१४
आमची सशक्त गुरे अवजड वाहने वाहतील. आमच्या तटबंदीला भगदाडे पडणार नाहीत, आम्ही पारतंत्र्यात जाणार नाही, आमच्या रस्त्यावर दुःखाच्या आरोळ्या ऐकू येणार नाहीत.
१५
ज्या लोकांना असे आशीर्वाद लाभतात ते सुखी होत; ज्या लोकांचा परमेश्वर याहवेह आहे, ते लोक धन्य आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options