मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १३९:१९-२४

दुष्टांविरुद्ध प्रार्थना व आत्मपरीक्षण

स्तोत्रसंहिता १३९:१९-२४
१९
हे परमेश्वरा, दुष्ट लोकांचा तुम्ही नायनाट केला तर किती बरे होईल! अहो रक्तपिपासू लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा!
२०
ते तुमच्याविरुद्ध दुष्टपणाच्या गोष्टींची योजना करतात; तुमचे शत्रू तुमच्या नामाचा गैरवापर करतात.
२१
याहवेह, तुमचा द्वेष करणार्‍यांचा मीही द्वेष करू नये काय आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्‍यांचा मी तिरस्कार करू नये काय?
२२
मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना माझे शत्रू मानतो.
२३
हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा; माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा.
२४
बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही, आणि मग मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने घेऊन जा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options