Skip to content
स्तोत्रसंहिता ११९:८१-८८

स्तोत्रसंहिता ११९:८१-८८

८१
तुम्ही केलेल्या तारणप्राप्तीसाठी माझा जीव उत्कंठित झाला आहे, पण तुमच्या वचनावर मी आशा ठेवतो.
८२
तुमच्या अभिवचनपूर्तीची वाट पाहून माझे डोळे शिणले आहेत; मी म्हणतो, “तुम्ही माझे सांत्वन केव्हा करणार?”
८३
जरी मी धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा झालो आहे; तरी मी तुमचे नियम कधीही विसरत नाही.
८४
तुमच्या सेवकाने किती काळ वाट पाहावी? माझा छळ करणार्‍यांना तुम्ही कधी शिक्षा कराल?
८५
अहंकारी मला अडकविण्यासाठी खड्डे खणत आहेत, जे तुमच्या नियमाविरुद्ध आहे.
८६
तुमच्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; तुम्ही मला साहाय्य करा, विनाकारण माझा छळ होत आहे.
८७
त्यांनी पृथ्वीवरून मला जवळपास नामशेषच केले होते; तरी तुमचे नियम मी नाकारले नाही.
८८
तुमच्या अक्षय प्रीतीस अनुसरून माझ्या जिवाचे रक्षण करा, म्हणजे तुमच्या मुखातून निघालेले नियम मला पाळता येतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options