मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ११९:१७-२४

गिमेल: नियमशास्त्रातून जीवन व बोध शोधणे

स्तोत्रसंहिता ११९:१७-२४
१७
मी जिवंत असेपर्यंत मला विपुल आशीर्वादित करा, म्हणजे मी तुमच्या वचनाचे पालन करीत राहीन.
१८
तुमच्या नियमशास्त्रातील अद्भुत रम्य गोष्टी पाहण्यासाठी माझे डोळे उघडा.
१९
या पृथ्वीवर मी केवळ एक प्रवासी आहे; तुमच्या आज्ञा माझ्यापासून लपवून ठेऊ नका.
२०
तुमच्या नियमांची सतत लागलेली उत्कंठा मला कासावीस करते.
२१
तुमच्या आज्ञांपासून पथभ्रष्ट झालेल्या शापित आणि गर्विष्ठ लोकांना तुम्ही धमकाविता.
२२
त्यांनी केलेला उपहास व तिरस्कारास माझ्यापासून दूर करा, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो.
२३
अधिपती जरी एकत्र बसतात व माझ्याविरुद्ध बोलतात, तरी तुमचा सेवक तुमच्या विधींचे मनन करेल.
२४
तुमचे नियम मला आनंददायी वाटतात; तेच माझे सल्लागार आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options