स्तोत्रसंहिता ११९:१३०-१३४
१३०
तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो; ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते.
१३१
माझे मुख उघडून मी धापा टाकल्या, कारण तुमच्या आदेशाची मला आस लागली होती.
१३२
मजकडे वळा आणि माझ्यावर दया करा, जशी तुमच्या नामावर प्रीती करणार्यांवर तुम्ही नेहमी करता, तशी करा.
१३३
तुमच्या वचनानुसार माझ्या पावलांचे मार्गदर्शन करा, म्हणजे पाप मजवर सत्ता गाजविणार नाही.
१३४
मनुष्याच्या अत्याचारापासून मला सोडवा, म्हणजे मला तुमच्या आज्ञा पाळता येतील.
Settings