स्तोत्रसंहिता ११८:२५-२७
२५
याहवेह, आमचे तारण करा! याहवेह, आम्हाला यशस्वी करा!
२६
याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो. आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.
२७
याहवेहच परमेश्वर आहेत; त्यांनी त्यांचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे. डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या शिंगापर्यंत जाण्यासाठी मिरवणुकीत सामील व्हा.