७
हे माझ्या जिवा, पुन्हा एकदा शांतचित्त हो, कारण याहवेहने तुझे भले केले आहे.
८
कारण हे याहवेह, तुम्ही मला मृत्यूपासून सोडविले, माझे डोळे अश्रूंपासून आणि माझे पाय अडखळण्यापासून रक्षिले आहेत.
९
जेणेकरून मी जिवंत लोकांमध्ये राहून, याहवेहच्या समक्षतेत चालू शकेन.