स्तोत्रसंहिता ११६:३-६
३
मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले होते; कबरेच्या भयाने मला ग्रासले, दुःख व क्लेशांनी माझ्यावर मात केली होती.
४
तेव्हा मी याहवेहचा धावा करून म्हणालो: “हे याहवेह, मला वाचवा!”
५
याहवेह कृपाळू आणि नीतिमान आहेत; आपले परमेश्वर करुणामय आहेत.
६
याहवेह साध्याभोळ्या लोकांचे रक्षण करतात; मी गर्तेत ओढला गेलो असताना, त्यांनी मला वाचविले.
Settings