Skip to content
स्तोत्रसंहिता ११०:४

स्तोत्रसंहिता ११०:४

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.”
याहवेहच सीयोनातून तुझ्या सामर्थ्यवान राजदंडाचा विस्तार करतील व म्हणतील, “तू तुझ्या शत्रूंवर सत्ता गाजव!”
तुझी सेना युद्ध समयी स्वेच्छेने तुला साथ देईल. प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे पवित्रतेने सुशोभित होऊन तुझे तरुण तुझ्याकडे येतील.
याहवेहने जी शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”
तुझ्या उजव्या हाताशी प्रभूचे सानिध्य आहे; आपल्या क्रोधाच्या दिवशी ते अनेक राजांना तुडवतील.
ते राष्ट्रांवर आपला यथार्थ निकाल घोषित करतील, मृतदेहांचा ढीग लागेल आणि ते संपूर्ण पृथ्वीच्या शासकांना चिरडून टाकतील.
तेव्हा प्रभू वाटेवरील ओहोळातील पाणी पितील, आणि आपले मस्तक उंचावतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options