स्तोत्रसंहिता ११:१-३
१
संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. मी याहवेहचा आश्रय घेतला आहे. तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात: “पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,”
२
कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत, त्यावर आपले बाण चढविले आहेत की अंधारातून बाण मारून सरळ मनाच्या लोकांची हत्या करावी.
३
जर पायाच नष्ट झाला, तर नीतिमान काय करणार?
Settings