स्तोत्रसंहिता १०९:६-१५
६
त्यांच्यावर अन्यायी मनुष्य अधिकारी म्हणून नियुक्त करा; आरोप लावणारा त्याच्या उजव्या हातास उभा ठेवा.
७
त्याचे प्रकरण निकालासाठी येताच तो दोषी ठरविल्या जावो, त्याचीच प्रार्थना त्यास दंडाज्ञा देवो.
८
त्याच्या आयुष्याची वर्षे अल्पकालीन होवोत; त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.
९
त्याची मुले पितृहीन होवोत, आणि त्याची पत्नी विधवा होवो;
१०
त्याची मुले भीक मागत भटकोत, त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या घरातून ते बाहेर हाकलण्यात येवो.
११
त्याची सर्व मालमत्ता सावकार हिरावून घेवो; आणि त्याने कष्टाने मिळविलेले सर्वकाही परके लुटोत.
१२
त्याच्यावर दया करणारा कोणीही नसो; त्याच्या पितृहीन मुलांची कीव करणारा कोणीही नसो,
१३
त्याची सर्व पितृहीन मुले मरोत; एकाच पिढीमध्ये त्याच्या वंशाचे नाव पुसून टाकले जावो.
१४
त्याच्या आईवडिलांच्या अपराधांबद्दल याहवेह त्याला शासन करो; त्याच्या मातेची पातके कधीही पुसली न जावो.
१५
त्याने केलेल्या दुष्ट कृत्यांची याहवेह सतत आठवण ठेवो, व पृथ्वीवरून त्याचे नाव ते कायमचे पुसून टाकोत.
Settings