Skip to content
स्तोत्रसंहिता १०७:२३-३२

समुद्रातील संकटग्रस्तांचे चौथे उदाहरण

स्तोत्रसंहिता १०७:२३-३२
२३
काहीजण सागरात गलबतांमधून प्रवास करीत; ते महासागरातून येजा करून व्यापार करीत.
२४
त्यांनी याहवेहची कृत्ये, समुद्राच्या खोल तळाशी केलेले चमत्कार पाहिले.
२५
ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन, त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या.
२६
त्या वर आकाशापर्यंत जातात, व मग समुद्रतळापर्यंत खाली येतात; या धोक्यातून जाताना त्यांचा धीर खचतो.
२७
ते मद्यप्यांसारखे डुलतात, झोकांड्या खातात; त्यांची मति कुंठित होते.
२८
त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
२९
त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले, आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या.
३०
ते शांत वातावरण बघून हे लोक हर्षित झाले, याहवेहनी त्यांना सुखरुपपणे त्यांच्या इच्छित बंदरात आणले.
३१
याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.
३२
लोकांच्या सभेत त्यांनी जाहीरपणे परमेश्वराचा जयजयकार करावा, आणि पुढार्‍यांच्या सभेत त्यांची महिमा गावी.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.