मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १०५:२६-३६

मिसरमध्ये चिन्हे व अद्भुत कृत्ये

स्तोत्रसंहिता १०५:२६-३६
२६
तेव्हा परमेश्वराने आपले प्रतिनिधी म्हणून मोशेला व अहरोनाला निवडून पाठवले.
२७
त्यांनी इजिप्ती समोर याहवेहचे चमत्कार केले, हामच्या भूमीवर त्यांची अद्भुत कार्ये प्रकट केली.
२८
परमेश्वराने अंधकार पाठवून त्या संपूर्ण देशाला अंधकारमय केले— कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाची अवहेलना केली नाही का?
२९
त्यांनी इजिप्तच्या सर्व पाण्याचे रक्त केले, आणि परिणामतः त्यातील मासे मरून गेले.
३०
मग त्या राष्ट्रात प्रचंड संख्येने बेडके उत्पन्न झाली, राजाच्या शयनकक्षात देखील ती पोहोचली.
३१
ते बोलले आणि गोमाश्यांचे, आणि कीटकांचे थवे प्रचंड प्रमाणात संपूर्ण देशावर आले.
३२
पावसाच्या पाण्याचे गारात रूपांतर केले, आणि विजेच्या अग्निलोळांनी त्या राष्ट्रावर वर्षाव केला.
३३
त्यांचे द्राक्षवेल आणि अंजिराची झाडे त्यांनी उद्ध्वस्त केली, देशातील सर्व झाडे कोलमडून पडली.
३४
त्यांनी आदेश दिला आणि टोळांनी आक्रमण केले, टोळांचे थवेच्या थवे आले;
३५
त्यांनी देशातील सर्व हिरवळ खाऊन टाकली, आणि सर्व पिके गिळंकृत केली.
३६
मग त्यांनी त्यांच्या देशातील प्रत्येक ज्येष्ठ संतानास ठार केले, जे त्यांच्या पुरुषत्वाचे प्रथमफळ होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options