स्तोत्रसंहिता १०५:२४-२८
२४
याहवेहने इस्राएली लोकांना अत्यंत समृद्ध केले; त्यांच्या शत्रूपेक्षाही त्यांची लोकसंख्या अधिक झाली,
२५
त्यांच्या सेवकांविरुध्द कट करण्यासाठी परमेश्वराने इजिप्ती लोकांचे मन फिरविले.
२६
तेव्हा परमेश्वराने आपले प्रतिनिधी म्हणून मोशेला व अहरोनाला निवडून पाठवले.
२७
त्यांनी इजिप्ती समोर याहवेहचे चमत्कार केले, हामच्या भूमीवर त्यांची अद्भुत कार्ये प्रकट केली.
२८
परमेश्वराने अंधकार पाठवून त्या संपूर्ण देशाला अंधकारमय केले— कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाची अवहेलना केली नाही का?
Settings