Skip to content
स्तोत्रसंहिता १०२:१-७

स्तोत्रसंहिता १०२:१-७

संकटसमयीच्या आक्रांत पुरुषाची अभ्यर्थना. तो अत्यंत उदास आहे आणि याहवेहच्या समोर स्वतःच्या हृदय-वेदनेचे वर्णन करीत आहे. हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो.
मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा.
कारण माझे दिवस धुरासारखे विरून जात आहेत; माझ्या हाडांचा जळत्या कोळशासारखा दाह होत आहे.
माझे हृदय गवताप्रमाणे करपून व कोमेजून गेले आहे; अन्न सेवन करण्याचेही मला स्मरण होत नाही.
निराशेने आता अधिकच उच्चस्वरात कण्हत असून मी कातडी व हाडे यांचा सापळा झालो आहे.
ओसाड प्रदेशातील घुबडासारखा, भग्नावशेषातील घुबडासारखा मी झालो आहे.
मी जागाच राहतो. छपरावर एकाकी असणार्‍या पक्ष्यासारखा मी झालो आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options