नीतिसूत्रे ५:३-६
३
कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो;
४
परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.
५
तिचे पाय मृत्यूकडे जातात; तिची पावले सरळ अधोलोकी नेतात.
६
जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही; तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते.
Settings