नीतिसूत्रे ४:१९-२७
१९
दुर्जनाचा मार्ग गडद अंधकाराप्रमाणे आहे; त्यांना काय अडखळविते हे त्यांना कळत नाही.
२०
माझ्या मुला, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे; माझ्या शब्दांकडे तुझे कान लाव.
२१
त्यांना तुझ्या दृष्टीपासून दूर जाऊ देऊ नकोस; त्यांना तुझ्या अंतःकरणात ठेव;
२२
कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत. आणि ते त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात.
२३
सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर, कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते.
२४
सर्वप्रकारच्या विकृती तुझ्या मुखापासून दूर ठेव; अपभ्रष्ट भाषण तुझ्या ओठांपासून दूर असू दे.
२५
तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा; तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव.
२६
तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार कर, आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा.
२७
उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस; वाईटाकडे जाण्यापासून तुझी पावले दूर ठेव.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings