नीतिसूत्रे ३०:३२
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ३२ दाखवत आहे.
२९
“तीन गोष्टी आहेत, ज्यांची चाल अत्यंत डौलदार असते, चार प्राणी ज्यांची हालचाल डौलदार असते:
३०
सिंह, सर्व प्राण्यात सामर्थ्यशाली, तो कोणाही समोर मागे सरत नाही;
३१
तोऱ्यात चालणारा एक कोंबडा, बोकड, आणि बंडखोरीविरुद्ध सुरक्षित असलेला राजा.
३२
“जर तू आत्मप्रशंसेने फुगून मूर्खपणा केला असशील किंवा दुष्ट योजना आखली असशील, तर हातांनी आपले तोंड झाकून घे.
३३
कारण जसे साय घुसळल्याने लोणी मिळते, व नाक पिळण्याने रक्त निघते, तसेच क्रोध भडकविल्याने कलह उत्पन्न होतात.”
Settings