உள்ளடக்கத்திற்குச் செல்க
नीतिसूत्रे ३:१-६

नीतिसूत्रे ३:१-६

माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस, परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव;
कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील, आणि तुला शांती आणि समृद्धी देतील.
प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत; त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध, त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव.
तेव्हा तुला परमेश्वराकडून आणि मानवाकडून अनुग्रह आणि सत्कीर्ती प्राप्त होतील.
तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव; आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;
तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा, आणि ते तुझे मार्ग सुकर करतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options