Skip to content
नीतिसूत्रे २९:१-७

नीतिसूत्रे २९:१-७

अनेकदा कान उघाडणी केली तरीही जो ताठ मानेचाच राहतो, त्याचा अचानक नाश होईल—त्याला कोणताही इलाज नसेल.
जेव्हा नीतिमानाची भरभराट होते, तेव्हा लोक हर्षोल्हास करतात; जेव्हा दुष्ट सत्ताधारी झाले की, लोक दुःखाने विव्हळतात.
ज्या मनुष्याला ज्ञान प्रिय आहे, तो त्याच्या वडिलांना आनंदी करतो, परंतु वेश्यांच्या सहवासात राहणारा आपले धन उधळतो.
न्यायाने राजा राष्ट्राला स्थैर्य देतो, परंतु ज्याला लाचेचा लोभ असतो, तो ते कोसळून टाकतो.
जे लोक त्यांच्या शेजार्‍यांची खुशामत करतात, ते त्यांच्या पायासाठी सापळा पसरवितात.
दुष्ट कृत्ये करणारे स्वतःच्या पापामुळेच सापळ्यात अडकतात, परंतु नीतिमान आनंदाने गर्जना करतात आणि हर्षित असतात.
नीतिमानाला गरिबांच्या हक्कांची काळजी असते, पण दुष्ट अशा गोष्टीची पर्वा करीत नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options