मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २५:१६-२०

संयम व शेजाऱ्यांच्या सीमा

नीतिसूत्रे २५:१६-२०
१६
तुम्हाला मध मिळाला तर, पुरेसाच खा— जास्त मध खाल्ल्यास तुम्ही ओकारी कराल.
१७
तुझ्या शेजार्‍यांकडे पाय क्वचितच टाक— अतिपरिचय केल्यास शेजारी तुझा द्वेष करतील.
१८
शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे.
१९
संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे म्हणजे तुटक्या दातांनी चावणे किंवा मोडक्या पायांनी पळण्यासारखे आहे.
२०
ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, किंवा जखमेवर शिरका ओतणार्‍यासारखे आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options