मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २१:२७-३१

दुष्ट योजनांची निष्फळता

नीतिसूत्रे २१:२७-३१
२७
दुष्टांच्या यज्ञार्पणांचा याहवेहला वीट आहे— तर मग जेव्हा वाईट हेतूने अर्पण आणले जाते ते किती तिरस्करणीय असेल!
२८
खोटा साक्षीदार नाश पावेल, परंतु काळजीपूर्वक ऐकणारा यशस्वी रीतीने साक्ष देईल.
२९
दुष्ट निर्भयतेचा आव आणतो, पण सरळ मनुष्य मात्र विचारपूर्वक मार्ग निवडतो.
३०
मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत.
३१
लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options