मूर्ख व निंदकांशी व्यवहार
२५
निंदकाला चाबकाचा मार द्या, म्हणजे साधाभोळा धडा शिकेल; सुज्ञांना फटकारणी करा, म्हणजे ते अधिक सुज्ञ होतील.
२६
जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात, ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते.
२७
माझ्या मुला, जर शिक्षण ऐकण्याचे थांबवलेस, तर ज्ञानाच्या वचनापासून तू दूर जाशील.
२८
भ्रष्ट साक्षीदार न्यायाची अवहेलना करतात; दुष्टांचे मुख दुष्टता गिळून टाकतात.
२९
निंदकांसाठी शिक्षा आणि मूर्खांची पाठ फटक्यांसाठी निर्धारित केली आहे.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.