Skip to content
नीतिसूत्रे १८:१३-१८

न्यायनिवाड्यातील ज्ञान व अंतर्बल

नीतिसूत्रे १८:१३-१८
१३
ऐकून घेण्याआधीच उत्तर देणे— ते मूर्खपणाचे आणि लाजिरवाणे आहे.
१४
मनुष्याचा आत्मा त्याला आजारी अवस्थेतही स्थिर ठेवतो, पण तुटलेले हृदय कोण सहन करू शकतो?
१५
विवेकशील मनुष्याचे अंतःकरण ज्ञान आत्मसात करते. सुज्ञाचे कान ज्ञानाचा शोध घेतात.
१६
उपहार तो देणार्‍याचा मार्ग मोकळा करते, तो तुम्हाला थोर लोकांच्या पुढे घेऊन जाईल!
१७
दुसरा कोणीतरी पुढे येऊन पक्ष मांडत नाही, तोपर्यंत न्यायालयात प्रथम बोलणार्‍याची बाजू योग्य वाटते.
१८
नाणेफेक करून भांडण मिटवता येते, आणि प्रबळ प्रतिस्पर्ध्यांला दूर ठेवता येते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options