Skip to content
नीतिसूत्रे १३:१०-१४

गर्व, ज्ञान व नियमशास्त्र

नीतिसूत्रे १३:१०-१४
१०
जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.
११
कपटाने मिळविलेला पैसा झिजून नाहीसा होतो, पण जो हळूहळू कष्ट करून पैसे जमा करतो, तो त्यात वाढ करतो.
१२
आशेची प्राप्ती लांबणीवर पडल्याने हृदय खिन्न होते, परंतु पूर्ण झालेली इच्छा, जीवनाचा वृक्ष ठरते.
१३
जो शिक्षण तुच्छ लेखतो, तो त्याचा परिणाम भोगेल, पण जो आज्ञेचा मान राखतो, त्याला चांगले प्रतिफळ मिळेल.
१४
सुज्ञ मनुष्याचा सल्ला जीवनाचा झरा आहे. तो मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवितो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options