Skip to content
नीतिसूत्रे १२:५-११

नीतिसूत्रे १२:५-११

५
नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते, परंतु दुष्टाचा सल्ला कपटी असतो.
६
दुष्टांचे शब्द रक्तपात करण्यासाठी टपून बसतात परंतु नीतिमानाची वाणी त्यांची सुटका करते.
७
दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात, परंतु नीतिमानाचे घराणे स्थिर उभे असते.
८
मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते, परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो.
९
स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे.
१०
नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या गरजांची काळजी घेतो, परंतु दुष्ट लोकांच्या अत्यंत दयेची कार्येही क्रूर असतात.
११
जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात, तो अक्कलशून्य असतात.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.