Skip to content
नीतिसूत्रे ११:९-१४

नीतिसूत्रे ११:९-१४

भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्‍याचा नाश होतो, परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते.
१०
जेव्हा नीतिमानांना यश मिळते, तेव्हा नगर आनंदित होते; जेव्हा दुष्टांचा नाश होतो, तेव्हा जयघोषाचा निनाद होतो.
११
नीतिमानांच्या आशीर्वादाने नगरास प्रतिष्ठा मिळते, परंतु दुष्टांच्या वक्तव्यांनी नगराचा नाश होतो.
१२
विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्‍याची निंदा करतो; परंतु सुज्ञ मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालतो.
१३
चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही.
१४
मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते, परंतु अनेक सल्लागार असल्याने विजय प्राप्त होतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options