Skip to content
नीतिसूत्रे ११:१-८

प्रामाणिकपणा व दैवी न्याय

नीतिसूत्रे ११:१-८
खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो.
जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते.
नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो.
प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते.
निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते, परंतु दुष्ट लोक स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे पतन पावतात.
नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात.
मर्त्य मानवांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते, त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने निष्फळ होतात.
नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते, आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options