Skip to content
नीतिसूत्रे ११:२७-३१

चांगुलपणाचा शोध व अंतिम प्रतिफळ

नीतिसूत्रे ११:२७-३१
२७
जो चांगल्या गोष्टींचा शोध घेतो त्याला कृपा प्राप्त होते, परंतु जो वाईटाचा शोध घेतो त्याला तेच प्राप्त होते.
२८
जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल.
२९
जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा मिळेल, आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल.
३०
नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो.
३१
जर नीतिमान लोकांना पृथ्वीवरच प्रतिफळ मिळते, तर मग अनीतिमान व पापी लोकांना किती मोठ्या प्रमाणात मिळेल!
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options