Skip to content
फिलेमोन १:११-१६

फिलेमोन १:११-१६

११
तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे.
१२
तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवित आहे.
१३
शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते.
१४
परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे.
१५
कदाचित या कारणासाठी तो थोडा काळ तुझ्यापासून वेगळा झाला असेल, जेणेकरून तू त्याला सर्वकाळासाठी प्राप्त करून घ्यावे.
१६
परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options