गणना ७:८०-८९
८०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
८१
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
८२
पापार्पणासाठी एक बोकड;
८३
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
८४
जेव्हा वेदीचा अभिषेक झाला तेव्हा इस्राएलच्या पुढार्यांकडून तिच्या समर्पणाची अर्पणे ही होती: बारा चांदीची ताटे, बारा शिंपडण्याचे भांडे आणि बारा सोन्याची पात्रे होती.
८५
चांदीचे प्रत्येक ताट एकशे तीस शेकेल वजनाचे होते आणि शिंपडण्याचे प्रत्येक भांडे सत्तर शेकेल वजनाचे होते. ते सर्व मिळून, चांदीची भांडी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती.
८६
धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे, प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती. पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ते सोन्याचे पात्र एकशेवीस शेकेल वजनाचे होते.
८७
होमार्पण व त्याबरोबर अन्नार्पणासाठी एकूण बारा तरुण बैल, बारा गोर्हे, एक वर्षाची बारा नरकोकरे होती. बारा बोकडे पापार्पणांसाठी वापरण्यात आली.
८८
शांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती.
८९
जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings