गणना ६:९-१२
९
“ ‘जर नाजीराच्या समक्षतेत कोणी अचानक मरण पावला, तर त्यांच्या डोक्यावरील केस, समर्पणाचे प्रतीक विटाळले जाते, त्यावेळी सातव्या दिवशी; शुद्धीकरणाच्या दिवशी त्यांनी आपले मुंडण करावे.
१०
मग आठव्या दिवशी त्यांनी दोन कबुतरे किंवा पारव्यांची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी.
११
मग नाजीरासाठी याजकाने त्यापैकी एक पापार्पण व दुसरा होमार्पणाचे प्रायश्चित म्हणून अर्पण करावा, कारण मृतदेहाच्या समक्षतेत राहून त्यांनी पाप केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा आपले डोके पवित्र करावे.
१२
आणि त्यांनी आपला नाजीरपणाचा काळ याहवेहसाठी पुनर्समर्पित करावा आणि दोषार्पण म्हणून एक वर्षाचा कोकरा आणावा. आधीचे दिवस मोजले जाणार नाही, कारण त्यांच्या समर्पित असलेल्या काळात ते विटाळले गेले.
Settings