गणना ६:१३-२१
१३
“ ‘आणि त्यांचा समर्पणाचा काळ संपल्यानंतर नाजीरांसाठी हा नियम असावा. त्यांना सभामंडपाच्या दाराशी आणावे,
१४
त्या ठिकाणी त्यांनी याहवेहसाठी ही अर्पणे सादर करावी: होमार्पणासाठी एक वर्षाचा निर्दोष कोकरा व पापार्पणासाठी मेंढी आणावी व शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी निर्दोष गोर्हा आणावा.
१५
त्याबरोबर त्यांचे अन्नार्पण व पेयार्पण आणि एक टोपलीभर सपिठाची आणि बेखमीर भाकरी—जैतुनाच्या तेलात मळलेल्या जाड भाकरी व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी आणाव्या.
१६
“ ‘याजकाने ही अर्पणे याहवेहसमोर सादर करून पापार्पण व होमार्पण करावे.
१७
याजकाने बेखमीर भाकरीची टोपली सादर करावी व अन्नार्पण व पेयार्पण याबरोबर याहवेहसाठी शांत्यर्पण म्हणून गोर्हाचा यज्ञ करावा.
१८
“ ‘मग नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे, ते सभामंडपाच्या दारात मुंडवावे. मग ते केस घेऊन त्यांनी शांत्यर्पणाखाली असलेल्या अग्नीत टाकावे.
१९
“ ‘नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे ते मुंडण केल्यानंतर, याजकाने त्यांच्या हातात गोर्हाचा उकळलेला खांद्याचा भाग व खमीर न घालता बनविलेल्या दोन्ही, एक जाड व एक पातळ भाकर ठेवावी.
२०
नंतर याजकाने ते हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहपुढे ओवाळावे; ते पवित्र आहे; त्याचबरोबर ओवाळलेला उराचा भाग आणि सादर केलेला मांडीचा भाग याजकासाठी असावा. यानंतर नाजीर द्राक्षारस पिऊ शकतो.
२१
“ ‘हा नाजीराचा नियम आहे, जे आपल्या समर्पणानुसार याहवेहला अर्पण करण्याचा नवस करतात, त्या खेरीज त्यांना परवडेल त्यानुसार आणावे. नाजीराच्या नियमानुसार केलेले नवस त्यांनी पूर्ण केले पाहिजे.’ ”
Settings