Skip to content
गणना ४:२-१७

गणना ४:२-१७

“लेवींच्या शाखेतील कोहाथी लोकांची त्यांच्या कुळांनुसार व घराण्यानुसार जनगणना करा.
म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आहेत, त्यांची गणती करावी.
“सभामंडपातील परमपवित्र वस्तूंची काळजी घेण्याचे काम कोहाथी लोकांचे आहे.
ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा.
मग त्यांनी तो पडदा टिकाऊ चर्माने झाकावा व त्यावर निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि कोशाचे दांडे त्याच्या जागी बसवावे.
“समक्षतेच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि त्यावर बशा, ताट, वाट्या आणि पेयार्पणासाठी कलश ठेवावे; आणि निरंतरची अर्पणाची भाकर त्यावर असावी.
त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे एक कापड पसरावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे व मेजाचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.
“यानंतर त्यांनी प्रकाश देणारा दीपस्तंभ व त्यावरील दिवे, वातीचे चिमटे व त्यांची तबके आणि जैतुनाच्या तेलाचे वाटप करण्यासाठी त्याचे सर्व कलश हे सर्व निळ्या कापडाने झाकावे.
१०
मग त्यांनी ती सगळी उपकरणे टिकाऊ चर्माच्या आच्छादनात गुंडाळून ते वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावे.
११
“मग त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे व ते टिकाऊ चर्माने झाकावे आणि वेदीचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.
१२
“पवित्रस्थानाच्या सेवेसाठी वापरात आणली जाणारी सर्व पात्रे निळ्या कापडात गुंडाळावीत व त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि ती वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावी.
१३
“कास्य वेदीवरील सर्व राख काढावी आणि वेदी जांभळ्या रंगाच्या कापडाने झाकावी.
१४
मग वेदीच्या सेवेसाठी वापरात येणारी सर्व पात्रे म्हणजे अग्निपात्रे, मांसाचे काटे, फावडी आणि शिंपडण्याचे कटोरे त्यावर ठेवावे. मग त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि त्याचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.
१५
“नंतर अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी सर्व पवित्र साहित्य व पवित्र उपकरणे यावर आच्छादन घालण्याचे काम संपविल्यावर, जेव्हा छावणी पुढे जाण्यास सज्ज होईल, त्याचवेळी कोहाथी कुळाने ते वाहून नेण्यास पुढे यावे. परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये, नाहीतर ते मरतील. कोहाथी लोकांनी सभामंडपातील वस्तू वाहून न्यावयाच्या आहेत.
१६
“दिव्याचे तेल, सुगंधी धूप, रोजचे अन्नार्पण व अभिषेकाचे तेल, संपूर्ण निवासमंडप आणि त्यातील सर्व साहित्य, त्याचे पवित्र साहित्य व उपकरणे यांची जबाबदारी अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारकडे असावी.”
१७
याहवेहने मोशे व अहरोन यांना म्हटले,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options