Skip to content
गणना ४:१-११

गणना ४:१-११

१
याहवेह मोशेला आणि अहरोनाला म्हणाले:
२
“लेवींच्या शाखेतील कोहाथी लोकांची त्यांच्या कुळांनुसार व घराण्यानुसार जनगणना करा.
३
म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आहेत, त्यांची गणती करावी.
४
“सभामंडपातील परमपवित्र वस्तूंची काळजी घेण्याचे काम कोहाथी लोकांचे आहे.
५
ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा.
६
मग त्यांनी तो पडदा टिकाऊ चर्माने झाकावा व त्यावर निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि कोशाचे दांडे त्याच्या जागी बसवावे.
७
“समक्षतेच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि त्यावर बशा, ताट, वाट्या आणि पेयार्पणासाठी कलश ठेवावे; आणि निरंतरची अर्पणाची भाकर त्यावर असावी.
८
त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे एक कापड पसरावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे व मेजाचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.
९
“यानंतर त्यांनी प्रकाश देणारा दीपस्तंभ व त्यावरील दिवे, वातीचे चिमटे व त्यांची तबके आणि जैतुनाच्या तेलाचे वाटप करण्यासाठी त्याचे सर्व कलश हे सर्व निळ्या कापडाने झाकावे.
१०
मग त्यांनी ती सगळी उपकरणे टिकाऊ चर्माच्या आच्छादनात गुंडाळून ते वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावे.
११
“मग त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे व ते टिकाऊ चर्माने झाकावे आणि वेदीचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options